बाइक टॅक्सी धोरणामुळे राज्यात संघर्ष, वाहतूक संघटनांचा आक्रोश, कामगारांची आशा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्र सरकारच्या बाइक टॅक्सी अॅग्रीगेटर धोरणामुळे स्वस्त प्रवास, रोजगार वाढ आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी निर्माण झाली असून, पारंपरिक वाहतूक संघटनांचा विरोध कायम आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नव्या बाइक टॅक्सी अॅग्रीगेटर धोरणाने राज्यभर वाद निर्माण केला आहे. सरकारचं म्हणणं आहे की या योजनेमुळे अॅप-आधारित चालकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि नागरिकांना स्वस्त प्रवासाचा पर्याय मिळेल. पण वाहतूक संघटनांचा आरोप आहे की या निर्णयामुळे विद्यमान ऑटो आणि टॅक्सी चालकांचं नुकसान होणार आहे.
काय आहे सरकारचं म्हणणं?
या धोरणाअंतर्गत बाइक टॅक्सींना राज्यात कायदेशीर मान्यता मिळणार आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे नागरिकांना प्रवासखर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. बाइक टॅक्सीने प्रवास ऑटोरिक्षापेक्षा सुमारे ४०% आणि कॅबपेक्षा जवळपास ५६% स्वस्त पडणार आहे. दोनचाकी चालकांना त्यांच्या कामाच्या तासांनुसार प्रतिमहिना १५ हजारांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
advertisement
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील सात वर्षांत या धोरणामुळे राज्यात १.५ ते ३ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यामुळे लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी, डिजिटल पारदर्शकता आणि रोजगारनिर्मिती यांना चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
वाहतूक संघटनांचा विरोध कायम
वाहतूक संघटनांनी या धोरणाला विरोध दर्शवला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे बाजारात असमान स्पर्धा निर्माण होईल आणि ऑटो-टॅक्सी चालकांचं उत्पन्न कमी होईल. त्यांनी सरकारकडे या धोरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
advertisement
बाइक टॅक्सी वेल्फेअर असोसिएशनने हे धोरण लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनचे सदस्य कुनाल मोरे म्हणाले, हजारो तरुण या धोरणातून नवी संधी पाहत आहेत. सरकारने दबावाला बळी न पडता हे धोरण लागू करावं.
महिला प्रकोष्ठाच्या अध्यक्षा सोनाली शिंदे म्हणाल्या, अनेक महिला बाइक टॅक्सी चालवून घरखर्च आणि मुलांचं शिक्षण सांभाळत आहेत. हा बदल विरोधकांना पटत नाही.
advertisement
आता लक्ष सरकारच्या पुढच्या निर्णयावर
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, या धोरणामुळे लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी, डिजिटल पारदर्शकता आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. मात्र, विरोध आणि पाठिंबा या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष सुरूच आहे.
सरकार या वादाला कसं सामोरं जाणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
view commentsसरकार या वादाला कसं सामोरं जाणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
बाइक टॅक्सी धोरणामुळे राज्यात संघर्ष, वाहतूक संघटनांचा आक्रोश, कामगारांची आशा