Pune : हिंजवडी अन् खराडीसह 'या' मार्गावर प्रवाशांचा होणार प्रवास सोपा; लवकरच PMP करणार मोठी घोषणा

Last Updated:

Pune Double Decker Bus : पीएमपीच्या ताफ्यात 25 डबल डेकर बसांचा समावेश होणार आहे. या बसांचा प्रवास शहरातील प्रमुख मार्गांवर होईल. प्रवाशांना आरामदायी आणि जलद सफर अनुभवता येईल, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुधारेल.

News18
News18
पुणे : पुण्यातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएमपीकडून इलेक्ट्रिक डबलडेकर बसची चाचणी यशस्वी ठरल्यामुळे आता शहरात तब्बल 25 डबलडेकर घेण्याचा निर्णय झालेला आहे. ही बस संपूर्ण वातानुकूलित असून इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे प्रदूषणमुक्त प्रवासासाठी महत्त्वाची पाऊल मानली जात आहे.
PML ने घेतला महत्त्वाचा निर्णय
पीएमपी प्रशासनाने इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला. त्यानंतर विशेष चाचणीसाठी डबलडेकर बस हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क, विमाननगर अशा पाच मार्गांवर धाववण्यात आली होती. दहा दिवस चाललेल्या या यशस्वी चाचणीदरम्यान किरकोळ घटना वगळता बसला कोणतीही अडचण आढळली नाही. यामुळे प्रशासनाने 25 डबलडेकर बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आणि संचालक मंडळाची मान्यता देखील मिळाली आहे.
advertisement
पीएमपी प्रशासनाने सांगितले की, या बसांचा उपयोग शहरातील प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास देण्यासाठी केला जाईल. मुंबईत डबलडेकर बस यशस्वीपणे धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला आहे. पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावरची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डबलडेकर बस शहरातील सार्वजनिक वाहतुकीत बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
'या' दिवशी सुरु होणार 25 डबल डेकर बसचा प्रवास
निविदा प्रक्रियेनंतर या डबलडेकर बसला चालक आणि वाहक कंत्राटदारांकडून पुरवठा केला जाणार आहे. प्रशासनाने सांगितले की साधारण दोन ते तीन महिन्यांच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात या बसांचा वापर सुरू होईल. त्यामुळे नवीन वर्षात पुणेकरांना डबलडेकरमध्ये प्रवास करता येणार आहे.
advertisement
पुण्यातील डबल डेकर बसचे संभाव्य प्रमुख मार्ग
हिंजवडी फेज 3, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ, देहू ते आळंदी आणि चिंचवड ते हिंजवडी मार्गांवर प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. या मार्गांवर डबलडेकर बस चालविल्याने प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सुरक्षित होईल.
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, डबलडेकर बसची चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या बसांचा ताफ्यात समावेश होईल. प्रवाशांना ही सुविधा मिळाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : हिंजवडी अन् खराडीसह 'या' मार्गावर प्रवाशांचा होणार प्रवास सोपा; लवकरच PMP करणार मोठी घोषणा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement