India-Pakistan: पाकड्यांची जिरली, 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू; युद्ध थांबलं
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारताने केलेल्या जोरदार पलटवारानंतर पाकची बोंबडी वळाली. मोठं नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानने पळ काढला आहे.
मुंबई : मागील ३ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने केलेले हल्ले भारताने परतावून लावले. भारताने केलेल्या जोरदार पलटवारानंतर पाकची बोंबडी वळाली. मोठं नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानने पळ काढला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला आहे. ५ वाजेपासून शस्नसंधीची घोषणा केली आहे. भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 5 वाजेपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम केल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून भारत आणि पाकिस्तानशी बोलणं झालं आहे. दोन्ही देश शस्त्रसंधी करण्यास तयार असल्याची माहिती दिली होती. 'अमेरिकेने मध्यस्थी केलेल्या रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीस (FULL AND IMMEDIATE CEASEFIRE) सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी Common Sense आणि महान Great Intelligence वापर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!" असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं.
Location :
Delhi,Delhi
First Published :
May 10, 2025 6:02 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
India-Pakistan: पाकड्यांची जिरली, 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू; युद्ध थांबलं