गणेशोत्सव संपला, परतीच्या प्रवासासाठी ST सज्ज, सातारा विभागातून 'या' मार्गांवर सुटणार जादा बसेस, वाचा सविस्तर...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Satara News : गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून आता परतीच्या प्रवासाची वेळ आली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये परतणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय होऊ नये यासाठी...
Satara News : गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून आता परतीच्या प्रवासाची वेळ आली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये परतणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) विशेष सोय केली आहे. सातारा विभागातून पुणे, मुंबई आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारसाठी विशेष नियोजन
या अतिरिक्त बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. या नियोजननुसार रविवारी, 7 सप्टेंबर रोजी सातारा-स्वारगेट मार्गावर नेहमीच्या 56 बसव्यतिरिक्त 10 जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. तसेच, इतर आगारांमधूनही अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत:
- महाबळेश्वर (4), वाई (4), वडूज (3), मेढा (4), पारगाव खंडाळा (4), दहिवडी (3), कोरेगाव (4) अशा एकूण 26 जादा फेऱ्या उपलब्ध असतील.
- कराड-स्वारगेट मार्गावर कराड आणि पाटण आगाराच्या प्रत्येकी 8 अशा 16 जादा फेऱ्या असतील.
- फलटण-स्वारगेट मार्गावर फलटण आगाराच्या 10 बसेस सोडल्या जातील.
- महाबळेश्वर-स्वारगेट आणि वाई-स्वारगेट मार्गावर एकूण 10 बसेस धावतील.
advertisement
सोमवारसाठीची व्यवस्था
सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी देखील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
- सातारा-स्वारगेट मार्गावर वडूज (2), वाई (2), मेढा (4), पारगाव खंडाळा (2), दहिवडी (1), कोरेगाव (2), महाबळेश्वर (2) अशा एकूण 15 जादा फेऱ्या चालवल्या जातील.
- कराड-स्वारगेट मार्गावर कराड (6) आणि पाटण (4) अशा एकूण 10 बसेस असतील.
- फलटण-स्वारगेट मार्गावर फलटण आगाराच्या 5 बसेस धावतील.
- महाबळेश्वर-स्वारगेट आणि वाई-स्वारगेट मार्गावर वाई (6) आणि महाबळेश्वर (4) अशा एकूण 10 बसेस उपलब्ध असतील.
advertisement
या जादा बससेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक विकास माने यांनी केले आहे.
हे ही वाचा : St Bus : एसटी महामंडाळाला बाप्पा पावला; गणेशोत्सवानिमित्ताने केली तब्बल इतक्या कोंटीची कमाई
हे ही वाचा : शिर्डीत 'आर्थिक लूट' थांबणार! साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, आता साईभक्तांची होणार नाही गैरसोय
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
गणेशोत्सव संपला, परतीच्या प्रवासासाठी ST सज्ज, सातारा विभागातून 'या' मार्गांवर सुटणार जादा बसेस, वाचा सविस्तर...


