शिर्डीत 'आर्थिक लूट' थांबणार! साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, आता साईभक्तांची होणार नाही गैरसोय
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Ahmednagar News : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीतील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन...
Ahmednagar News : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीतील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्थानने 4 एकर जागेवर मोफत पार्किंग सुविधा सुरू केली आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, भाविकांची खासगी पार्किंगमध्ये होणारी आर्थिक लूट थांबणार आहे.
या नव्या सुविधेमुळे साईबाबांचे मंदिर परिसर भविष्यात 'नो व्हेईकल झोन' होण्याची शक्यता आहे. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पार्किंगचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि भविष्यात शिर्डीच्या सुशोभीकरणासाठी मोठे काम हाती घेतले जाईल, असे सांगितले. तसेच, त्यांनी भाविकांसाठी मोफत बससेवा सुरू करण्याची सूचनाही केली.
advertisement
मोफत बससेवा सुरू करण्याचा विचार
हे मोफत पार्किंग साईबाबा हॉस्पिटलजवळ असून, ते मंदिरापासून केवळ 700 मीटर अंतरावर आहे. भविष्यात या जागेत मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहे, वीज आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच पार्किंगमधून मंदिरापर्यंत भाविकांसाठी मोफत बससेवा सुरू करण्याचा विचारही संस्थान करत आहे.
advertisement
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरक्ष गाडीलकर म्हणाले की, "सध्या हे पार्किंग प्राथमिक स्तरावर सुरू केले आहे. भविष्यात येथे मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्यात येईल. सुविधा पूर्ण झाल्यावर मंदिराचा परिसर 'नो व्हेईकल झोन' घोषित करणे शक्य होईल."
हे ही वाचा : Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांसाठी सरकारची भन्नाट योजना! घरकुलासह या व्यवसायासाठी मिळणार पैसे
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 06, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिर्डीत 'आर्थिक लूट' थांबणार! साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, आता साईभक्तांची होणार नाही गैरसोय










