एकरी १० हजार रुपयांचं भांडवल, हिवाळ्यात या पिकातून ४५ दिवसांत कराल बक्कळ कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Winter Farming : पारंपरिक पिकांव्यतिरिक्त कमी खर्चात आणि अल्प कालावधीत जास्त उत्पन्न देणारी शेती करायची असेल तर भेंडी शेती हा उत्तम पर्याय आहे.
पारंपरिक पिकांव्यतिरिक्त कमी खर्चात आणि अल्प कालावधीत जास्त उत्पन्न देणारी शेती करायची असेल तर भेंडी शेती हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः हिवाळ्यात भेंडीचं उत्पादन कमी जोखमीचं आणि फायदेशीर ठरतं. केवळ १० हजार रुपयांच्या भांडवलातून ही शेती सुरू करून शेतकरी काही महिन्यांत ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
पिकाची लागवड आणि निगा - भेंडीसाठी मध्यम काळी किंवा हलकी वालुकामिश्र जमीन योग्य ठरते. हिवाळ्यात लागवड नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान करणे योग्य असते. ओळीतून अंतर १.५ ते २ फूट आणि झाडामधील अंतर १ फूट ठेवावे. बी पेरल्यानंतर साधारणपणे ४ ते ५ दिवसांत अंकुर फुटतो. फुलोऱ्यानंतर साधारण ४५ दिवसांनी तोडणीसाठी पहिली भेंडी तयार होते. प्रत्येक दोन दिवसांनी तोडणी करावी, कारण भेंडी वाढली की बाजारमूल्य कमी होते. नियमित पाणी देणे, तण नियंत्रण आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले मिळते.
advertisement
बाजारपेठ व नफा - भेंडीला स्थानिक बाजारात कायम मागणी असते. थेट शेतातून विक्री करून किंवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून शेतकरी अधिक नफा कमावू शकतात. काही शेतकरी हिवाळ्यातील शेवटच्या महिन्यांत म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीत उत्पादन बाजारात आणतात, जेव्हा इतर भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे दर चांगले मिळतात.


