भांडवल फक्त १५,००० रु, नोव्हेंबरमध्ये या शेतीतून फक्त ४० दिवसांत कमवा २ ते ३ लाख रुपये
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : नोव्हेंबरमध्ये मेथीची शेती करून ४० दिवसांत लाखो रुपये कमविण्याची मोठी संधी शेतकऱ्यांना आहे.
नोव्हेंबरमध्ये मेथीची शेती करून ४० दिवसांत लाखो रुपये कमविण्याची मोठी संधी शेतकऱ्यांना आहे. हवामानानुसार सध्या रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून, कमी खर्चात आणि अल्पावधीत जास्त नफा देणाऱ्या पिकांमध्ये मेथीचे पीक सर्वात फायदेशीर मानले जात आहे. मग आता लागवड कशी करायची? खर्च आणि किती नफा मिळू शकतो? या बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत...
advertisement
advertisement
बियाणे व खर्च - एक एकर लागवडीसाठी साधारण ८ ते १० किलो बियाणे लागतात. स्थानिक बाजारात मेथीचे बियाणे प्रति किलो ८० ते १२० रु किलो दराने मिळते. म्हणजेच बियाण्यांवर अंदाजे ८०० ते १,२०० खर्च येतो. त्यासोबतच नांगरणी, खत, पाणी व मजुरी मिळून एकरी एकूण खर्च सुमारे १५,००० ते २०,००० पर्यंत येतो. ड्रिप सिंचनाचा वापर केल्यास पाणी आणि खत दोन्हीची बचत होते आणि उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होते.
advertisement
उत्पादन आणि नफा - मेथी हे झटपट वाढणारे पीक असून ४० दिवसांतच बाजारात विक्रीस तयार होते. एक एकरातून सरासरी ८ ते १० क्विंटल हिरवी मेथी मिळू शकते. सध्या बाजारभाव ३० ते ५० प्रति किलोपर्यंत आहे. म्हणजेच एका एकरातून साधारण २.५ ते ४ लाख रुपये मिळू शकतात. खर्च वजा करता शेतकऱ्याला एकरी किमान २ ते ३ लाख रुपयांचा नफा सहज मिळतो.
advertisement
advertisement


