शनिदेव भरभरून देणार! या राशींच्या लोकांकडे नवीन संधीसह पैसाच पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा एक अत्यंत प्रभावी ग्रह मानला जातो. शनीदेव जीवनातील कर्म, वेदना, शिक्षा, तंत्रज्ञान, खनिज संपत्ती, नोकरी आणि नियतीशी संबंधित घटना नियंत्रित करतो.
advertisement
advertisement
वृषभ - राशी वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. शनीदेव तुमच्या राशीपासून 11व्या स्थानावर मार्गी होत असून, हा भाव लाभ, आर्थिक प्रगती आणि इच्छापूर्तीचा असतो. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील, आणि व्यवसायात भरभराट होईल. शनीदेव दशम स्थानाचे स्वामी असल्यामुळे कारकिर्दीत स्थैर्य येईल आणि पदोन्नतीचे संकेत मिळतील. कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. नेतृत्वगुण वाढतील, जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यातून यश मिळेल. नवीन व्यावसायिक संधी, भागीदारीचे प्रस्ताव आणि आर्थिक गुंतवणुकीतून लाभ होईल.
advertisement
तूळ राशी - तूळ राशीच्या व्यक्तींना शनी सहाव्या स्थानात मार्गी होणार आहे. त्यामुळे शत्रूंवर विजय, न्यायालयीन प्रकरणात यश आणि आरोग्यात सुधारणा असे सकारात्मक परिणाम होतील. या काळात नोकरदारांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, तर काहींना मल्टीनॅशनल कंपन्यांशी जोडलेले महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यापार विस्ताराचा उत्तम काळ आहे. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग आहेत. शनी तुमच्या राशीच्या पाचव्या आणि चौथ्या स्थानाचे स्वामी असल्यामुळे घरगुती सुख-सुविधा वाढतील, कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. मुलांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
धनू राशी - राशीसाठी शनी चौथ्या भावात मार्गी होत आहे, जो सुख-सुविधा, मालमत्ता आणि स्थिरतेचा भाव मानला जातो. त्यामुळे या काळात घरगुती जीवनात शांती, प्रगती आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल, तर नवीन प्रकल्प यशस्वी होतील.
शनी तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाचा स्वामी असल्यामुळे आर्थिक लाभ, संवाद कौशल्य वाढणे आणि सामाजिक मान-सन्मान मिळणे अशा अनेक शुभ गोष्टी घडतील. नोकरदारांना वरिष्ठांकडून गौरव, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि पदोन्नतीची शक्यता आहे. अचानक धनलाभ किंवा वारशातून फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.