3 ग्रहांची महायुती! 23 ऑगस्टपासून 5 राशींना जॅकपॉट लागणार, हाती बक्कळ पैसा येणार

Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः 21, 22 आणि 23 ऑगस्ट हे दिवस काही राशींसाठी भाग्यवृद्धी घेऊन येणार आहेत.
1/7
Astrology News
ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः 21, 22 आणि 23 ऑगस्ट हे दिवस काही राशींसाठी भाग्यवृद्धी घेऊन येणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:16 वाजता चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल, जिथे सूर्य आणि केतू आधीच उपस्थित आहेत. या तिन्ही ग्रहांच्या संयोगामुळे सिंह राशीत महायुती निर्माण होईल. ही महायुती 25 ऑगस्ट सकाळी 8:28 वाजेपर्यंत टिकेल, त्यानंतर चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषानुसार, या महायुतीमुळे काही राशींना नशीबाची साथ मिळणार असून करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात.
advertisement
2/7
मिथुन
मिथुन -   मिथुन राशीसाठी ही महायुती जीवनात स्थैर्य घेऊन येईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना जुनी थकलेली देणी वसूल होतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ फायदेशीर ठरेल, विशेषतः वयोवृद्धांच्या आरोग्यात सुधारणा होईल.
advertisement
3/7
सिंह
सिंह - सिंह राशीतच सूर्य-चंद्र-केतूची महायुती होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी दूर होतील व कामावर लक्ष केंद्रीत करणे सोपे होईल. कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होईल आणि वैवाहिक जीवनात शांतता निर्माण होईल. गुंतवणुकीसाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा काळ शुभ मानला जात आहे.
advertisement
4/7
कुंभ
कुंभ -   कुंभ राशीसाठीही ही महायुती लाभदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना धाडसी निर्णय घेण्यात यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. घरातील गैरसमज दूर होऊन वातावरण आनंदी राहील.
advertisement
5/7
तूळ
तूळ -   तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. व्यवसायात आलेल्या अडचणी दूर होतील आणि नवीन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या मेहनतीमुळे कामाला गती येईल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल आणि तुम्ही भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल.
advertisement
6/7
वृश्चिक
वृश्चिक -   वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या परिश्रमांचे फळ या काळात मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचा विश्वास वाढेल. समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावेल. वैयक्तिक जीवनातही शिस्त आणि स्थिरता वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून कौतुक मिळेल आणि तुमची भूमिका आदर्शवत ठरेल.
advertisement
7/7
मकर
मकर - मकर राशीसाठी ही महायुती अत्यंत शुभ आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, नोकरीत पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होऊन स्थैर्य वाढेल.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement