गुरुपौर्णिमेनंतर या राशींच्या लोकांचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार! पैसाच पैसा मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या महिन्यात भक्तगण उपवास, पूजा आणि जप-तप करून महादेवाची कृपा मिळवतात.
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या महिन्यात भक्तगण उपवास, पूजा आणि जप-तप करून महादेवाची कृपा मिळवतात. यंदाचा श्रावण महिना काही राशींना विशेष लाभदायक ठरणार आहे, कारण या काळात एक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ गजकेसरी राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग नशिबाचे दरवाजे उघडणारा ठरणार असून, नवी नोकरी, पदोन्नती, आर्थिक वाढ, तसेच अचानक धनलाभाचे योग निर्माण करत आहे.
advertisement
गजकेसरी राजयोग कधी तयार होतो? - 22 जुलै रोजी सकाळी 8:14 वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 24 जुलैपर्यंत तेच राहील. याच कालावधीत चंद्र आणि गुरु (बृहस्पति) एकाच राशीत असतील. जेव्हा मनाचा कारक ग्रह चंद्र आणि ज्ञानाचा कारक गुरु एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा गजकेसरी राजयोग निर्माण होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि ज्यांच्या राशीवर त्याचा प्रभाव पडतो, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.
advertisement
मिथुन - मिथुन राशीसाठी हा कालखंड अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तुमच्या भाग्यात अचानक मोठी सुधारणा होईल. व्यवसायात मोठ्या संधी मिळतील, एखादी फायदेशीर डील होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे योग तयार होतील. उत्पन्नात वाढ होईल आणि घरात आनंदमय वातावरण राहील. जुनी अडकलेली कामं पूर्ण होतील, आणि नवे प्रकल्प सुरू होऊ शकतात.
advertisement
कन्या - कन्या राशीच्या जातकांसाठी गजकेसरी योग मोठा आर्थिक फायदा देणारा ठरेल. गुंतवणुकीतून लाभ होईल, अचानक धनलाभ किंवा पूर्वीची थकीत रक्कम मिळू शकते. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. वाहनसुखाचे योग आहेत. मानसिक आणि शारीरिक तणाव दूर होईल. विवाह इच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
advertisement