solar eclipse: होळीनंतर 15 दिवसांनी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण! या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
solar eclipse: ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्र हे महत्त्वाचे मानले जातात. या दोन्ही ग्रहांवरून भविष्यातल्या महत्त्वाच्या घटनांचा वेध घेता येतो. त्यामुळे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटनांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. या दोन्ही घटनांचा मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम दिसतो, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. यंदा होळी पौर्णिमेनंतर सूर्यग्रहण आहे. फाल्गुन अमावस्येला सूर्यग्रहण असेल. या ग्रहणाचा पाच राशींवर सकारात्मक परिणाम दिसेल. या राशी कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊ या.
2024 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होळी पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला असेल. 8 एप्रिलला सूर्यग्रहण आहे. रात्री नऊ वाजून 12 मिनिटांनी सूर्यग्रहण लागेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. मध्यरात्री एक वाजून 25 मिनिटांनी सूर्यग्रहण सुटेल. गुरूच्या मीन राशीतलं हे सूर्यग्रहण काही राशींसाठी लाभदायक असेल.
advertisement
मेष : ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल. नोकरीत प्रगती, पदोन्नतीचे योग आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. वाहन खरेदी कराल. आईकडून धनलाभ होऊ शकतो. कला आणि संगीताविषयी आवड निर्माण होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनू : जर तुम्ही नवीन काम सुरू करायचा विचार करत असाल तर त्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल. नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल.एकूण वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण या राशींसाठी शुभ फलदायी असेल.