Kartiki Ekadashi 2025: श्रीहरी विष्णू 142 दिवसांच्या निद्रेतून जागे होणार; 4 राशीच्या लोकांची पुन्हा दिवाळीच
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi Astrology : यंदा कार्तिकी एकादशी १ नोव्हेंबर, शनिवारी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या एकादशीला देवोत्थान एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी या नावांनीही ओळखलं जातं. या एकादशीपासून विवाह, ग्रहप्रवेश यांसारख्या सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते, चातुर्मासाची चार महिन्यांची समाप्ती होते.
advertisement
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून ही वेळ खूप अनुकूल राहील. तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पाची किंवा कामाची सुरुवात करण्याचे धाडस करू शकता. त्याचबरोबर, भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होईल.
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी एकादशी अनेक संधी घेऊन येईल. तुमचे बहुतेक प्रयत्न यशस्वी होतील. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात सलोखा आणि प्रेमात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगती आणि यश घेऊन येणारा असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


