Weekly Horoscope: आनंदी-आनंद! भरगच्च सणांचा आठवडा या राशींना लकी; साप्ताहिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: ऑगस्टचा पहिला पूर्ण आठवडा काही राशींना विशेष लाभदायी ठरू शकतो. या आठवड्यात, कोणताही मोठा ग्रह राशी बदलणार नाही. 4 ते 10 ऑगस्ट 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत फारसे बदल होणार नाहीत. ग्रहांच्या सद्यस्थितीनुसार मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष - हा आठवडा आपल्यासाठी उर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. आपल्याला करिअरमध्ये एक नवीन संधी मिळू शकते, परंतु विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक बाबतीत संयम आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषत: डोकेदुखी किंवा थकवा संबंधित बाबींकडे दुर्लक्ष करू नका. कामांमध्ये उत्साह असेल पण कौटुंबिक बाबींमध्ये चिडचिड करून चालणार नाही.
advertisement
advertisement
मिथुन - लाभदायी प्रसंग या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना अनुभवायला मिळतील. समाजातील आपली प्रतिमा आणखी चांगली असेल आणि आपल्या विचारांचे कौतुक केले जाईल. हा आठवडा मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे. पण, भावंडांशी काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, बोलण्यात नम्रता असायला हवी. कामाच्या ठिकाणी सर्जनशीलता दाखवाल.
advertisement
advertisement
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लकी असणार आहे. अनेक कामांमध्ये जबरदस्त यश मिळवू शकता. आधी केलेली मेहनत आता सुख देईल, जुन्या प्रयत्नांमुळे आता चांगले परिणाम दिसू लागणार आहेत. सिंह राशीच्या लोकांचे नेतृत्व गुण दिसून येतील. जोडीदाराशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. मुलांशी संबंधित काही चिंता असू शकतात, त्यावर काळजीपूर्वक उपाय शोधावे लागतील.
advertisement
advertisement
तूळ - ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी लकी असणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक कामात लाभेल, तुमचे काही मोठे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुमचे सर्वांशी चांगले संबंध राहतील, विशेषतः जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी चांगलं जमेल. या आठवड्यात प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे, पण, प्रवास फायदेशीर ठरतील. कला आणि सौंदर्याशी संबंधित लोकांना कामात प्रशंसा मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
मकर - ऑगस्ट महिन्यातील हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार मोकळेपणानं व्यक्त करा, तुमचे विचार कदाचित बदल घडवू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा आता ठीक राहील.
advertisement
advertisement