पावसात कारचा प्रवास करताय? मग या 5 गोष्टी ठेवा लक्षात, येणार नाही प्रॉब्लम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
राज्यात मान्सून सुरू झाला आहे. पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत, गाडीने प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणतीही अडचण येणार नाही. या पाच पद्धती लक्षात ठेवल्यास पावसात कोणत्याही अडचणीशिवाय गाडी चालवता येते.
advertisement
गाडीतील वायपर, वॉशर आणि विंडशील्ड तपासा : पावसाळ्यात गाडीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी नेहमी वायपर, वॉशर आणि विंडशील्ड तपासले पाहिजेत. जर वायपर ब्लेडवर भेगा असतील किंवा ब्लेड जास्त जीर्ण झाला असेल तर वायपर बदलावा. जर विंडशील्ड घाणेरडे असेल तर ते पूर्णपणे स्वच्छ करावे. यासोबतच वॉशरमधील पाणी देखील तपासले पाहिजे.
advertisement
एसी चेक करा : पावसाळ्यात गाडीत श्वास गुदमरण्याची समस्या कमी करण्यासाठी आणि थंडावा राखण्यासाठी एसी योग्यरित्या काम करणे खूप महत्वाचे आहे. याशिवाय, जर एसी चालू नसेल तर विंडशील्डवर धुके तयार होते. ज्यामुळे व्हिजिबिलिटीवर परिणाम होतो. त्यामुळे पावसात गाडी चालवण्यापूर्वी एसी आणि एसी फिल्टर देखील तपासले पाहिजेत.
advertisement
गाडीत या गोष्टी ठेवा : पावसात गाडीने प्रवास करताना काही गोष्टी सोबत ठेवल्याने समस्या कमी होऊ शकतात. केबिनमधील घाण आणि ओलावा काढून टाकण्यासाठी फ्लोअर मॅट्स आणि सीट्स स्वच्छ करण्यासाठी कोरडे कापड ठेवा. यासोबतच एअर फ्रेशनर वापरा. पावसाळ्यात गाडीत छत्री, रेनकोट, टॉर्च, फर्स्‍ट एड किट, टूल किट आणि काही खाद्यपदार्थ ठेवावेत.
advertisement
advertisement
लाईट्स आणि ब्रेक देखील तपासा : पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा रस्ते अपघात टाळण्यासाठी काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. रस्त्यावर गाडीची उपस्थिती दाखवण्यात गाडीचे लाइट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून, हेडलाइट्स, बॅकलाइट्स, फॉग लॅम्प्स आणि ब्रेक लाईट्स योग्यरित्या कार्य करणे महत्वाचे आहे. जर काही दोष असेल तर तो बदलला पाहिजे. यासोबतच ब्रेक देखील तपासले पाहिजेत.