Mahindra ने लाँच केली बॅटमॅन एडिशन सुपर कार, फक्त 300 लकी ग्राहकांनाच मिळणार, PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असते. अशातच आता महिंद्राने चक्क बॅटमॅन कार लाँच केली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असते. अशातच आता महिंद्राने चक्क बॅटमॅन कार लाँच केली आहे. आता ही बॅटमॅनसारखी कार तर नाही पण ही कार आहे इलेक्ट्रिक SUV BE 6 चं 'बॅटमॅन' एडिशन. यासाठी महिंद्राने वॉर्नर ब्रदर्सशी हातमिळवणी केली आहे. या कारच्या फक्त 300 युनिट्स बनवल्या जातील. M&M ने BE 6 बॅटमॅन एडिशनची किंमत 27.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.
advertisement
advertisement
महिंद्राने इलेक्ट्रिक BE 6 ही काही महिन्यांपूर्वी लाँच केलेल्या दोन नवीन इलेक्ट्रिक कार पैकी एक आहे. ही पहिली कार आहे जी पूर्णपणे इलेक्ट्रिक कार म्हणून डिझाइन केली गेली आहे. तर मागील लाँच पेट्रोल SUV ला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करून केले गेले होते. BE 6 ची श्रेणी 21.9 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement