Bopdev Ghat: वाहनचालकांनो लक्ष द्या! बोपदेव घाट वाहतुकीसाठी सलग 7 दिवस बंद; असा असेल पर्यायी मार्ग
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Bopdev Ghat : बोपदेव घाट बंद असल्यामुळे पुरंदर आणि सासवड भागातून पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे
पुणे : पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. घाटातील रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामामुळे हा मार्ग गुरुवार, ८ जानेवारी ते १४ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
काय आहे कारण?
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात सध्या रस्त्याचे विस्तारीकरण आणि खडीकरणाचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता पूर्णतः बंद ठेवणे आवश्यक आहे. या काळात दुचाकी, चारचाकी किंवा कोणतीही एकेरी वाहतूक सुरू राहणार नाही.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
बोपदेव घाट बंद असल्यामुळे पुरंदर आणि सासवड भागातून पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे: 1. दिवे घाट मार्ग 2. नारायणपूरमार्गे कापूरहोळ किंवा चिव्हेवाडी घाट
सासवड-कोंढवा प्रवासासाठी बोपदेव घाट हा सर्वात जवळचा मार्ग असला तरी, कामाच्या निकडीमुळे तो आठवडाभर बंद राहणार आहे. "रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे," असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग (हवेली २) चे शाखा अभियंता देवेन मोरे यांनी केले आहे.
advertisement
बोपदेव घाट हा सासवड, पुरंदर आणि परिसरातील गावांसाठी पुण्याकडे जाणारा सर्वात जलद मार्ग मानला जातो. हा घाट आठवडाभर बंद राहणार असल्याने नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आता वाढणार आहे. विशेषतः कोंढवा आणि येवलेवाडी भागात राहणाऱ्या नागरिकांना सासवडकडे जाण्यासाठी आता दिवे घाटातून मोठा वळसा घालून जावे लागेल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 7:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Bopdev Ghat: वाहनचालकांनो लक्ष द्या! बोपदेव घाट वाहतुकीसाठी सलग 7 दिवस बंद; असा असेल पर्यायी मार्ग










