Nissan Magnite CNG लॉन्च!मायलेज पाहून पडाल प्रेमात, किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
NIssan Magnite आता सीएनजी किटसह खरेदी करता येईल. ही कार आता पूर्वीपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.
Nissan मॅग्नाइट ही निसानने एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. कंपनीने अलीकडेच या कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. पण कंपनीने आता ही कार सीएनजी किटसह खरेदी करता येईल असे जाहीर केले आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त कारमध्ये म्हणजेच निसान मॅग्नाइटमध्ये तुम्हाला सीएनजी फिटमेंटची हमी देखील मिळते. तसंच, हे सीएनजी किट कंपनीकडून फिटेड सीएनजी म्हणून येत नाही, यासाठी तुम्ही डीलरशिपमध्ये जाऊन वेगळे सीएनजी किट बसवू शकता.
advertisement
Nissan Magnite आता सीएनजीमध्ये उपलब्ध :कंपनीने ही कार सीएनजी किटसह सादर केली आहे. याचा अर्थ असा की ही कार आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त मायलेज देईल. प्रति किलो मागे हे मायलेज 18 ते 22 किलोमीटर असेल. परंतु कंपनीने निसान मॅग्नाइटच्या विद्यमान ग्राहकांना सल्ला दिला आहे की जुन्या मॅग्नाइट ग्राहकांनी सीएनजी रेट्रोफिटमेंट करू नये.
advertisement
CNG किटची किंमत किती आहे? : या सीएनजी किटसाठी 75000 रुपये वेगळे द्यावे लागतील अशी माहिती कंपनीने दिली आहे. हे सीएनजी किट भारत सरकारने मंजूर केलेल्या कोणत्याही डीलरशिप किंवा कोणत्याही रेट्रोफिटिंग सेंटरमध्ये स्थापित केले जाऊ शकतात. हे सीएनजी किट भारत सरकारने मंजूर केले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement