बारावीनंतर अमेरिकेत शिक्षण घ्यायचं असल्यास काय करायचं? किती खर्च येतो? एका क्लिकवर घ्या जाणून
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
हल्ली परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांची आणि ती पूर्ण करू शकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवीनंतरच नव्हे, तर काही जण 12वी झाल्यानंतरच शिकण्यासाठी परदेशात जाऊ इच्छितात. त्यासाठी काय करावं लागतं, किती खर्च येतो, वगैरे माहिती घेऊ या.
1 - बारावीनंतर परदेशात शिकण्याचं नियोजन करत असलात, तर त्याबद्दल पुरेशी माहिती आधीच घेणं गरजेचं आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया अर्थात पात्रता निकष. बारावी झाल्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत शिक्षणासाठी जायचं असेल, तर कोणते पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत, याबद्दल जाणून घेऊ या. अमेरिका हे शिक्षणासाठी वर्ल्ड क्लास डेस्टिनेशन मानलं जातं. अमेरिकेत शिकण्यासाठी बऱ्याच काळापासून प्राधान्य दिलं जातं.
advertisement
advertisement
3.मान्यताप्राप्त संस्थेतून 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असावं. अमेरिकेत ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचाय, त्या संस्थेला हवे तेवढे टक्के बारावीत मिळणं आवश्यक. विद्यार्थ्यांना इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पास करावी लागेल. त्यात IELTS, TOEFL वगैरेंचा समावेश. इंग्रजी बोलण्याची विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी SAT किंवा ACT यांसारख्या वेगवेगळ्या स्टँडर्डाइज्ड टेस्ट्स आहेत. या टेस्ट्स विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचं मूल्यमापन करण्यासाठी घेतल्या जातात.
advertisement
4 - लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि स्टँडर्डाइज्ड टेस्टच्या व्यतिरिक्त आणखीही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. त्यात एसे, SOPs, LORs आणि एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज आदींचा समावेश असतो. या सगळ्यासह विद्यार्थ्याचं प्रोफाइल पाहिलं जातं. अमेरिकेत जायचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या खर्चाबद्दल जाणून घेणंही अत्यावश्यक आहे. तिथे सर्वांत जास्त खर्च फी, ट्यूशन फी आणि लिव्हिंग चार्ज यासाठी येतो.
advertisement
5.अमेरिकेत सरकारी युनिव्हर्सिटीजमध्ये अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसची सरासरी ट्यूशन फी 25 हजार डॉलर्स अर्थात 18 लाख रु.पर्यंत आहे. खासगी विद्यापीठांत तो खर्च 37 हजार डॉलर्स अर्थात 26 लाख रु. खाण्यापिण्यासाठी सरासरी 500-1000 डॉलर्स म्हणजे 36 ते 72 हजार रु.पर्यंत खर्च येतो. राहण्याचा खर्च 1500 ते 2000 डॉलर्स, प्रवासासाठीही महिन्याला किमान100 ते 200 डॉलर्स अर्थात 7200 ते 14 हजार रुपये.