शेवटी ते बॉलिवूड! 'पुष्पा 2'ला अखेर झुकवलंच, 1600 चा कोटींचा गल्ला जमवूनही 'स्त्री 2' ला देऊ शकला नाही टक्कर

Last Updated:
Stree 2 Song 'Aaj Ki Raat': 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर सातत्याने रेकॉर्ड तोडत आहे, परंतु एका बाबतीत तो 'स्त्री 2' शी स्पर्धा करू शकला नाही.
1/7
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय. यामुळेच हा 2024 सालातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

advertisement
2/7
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर सातत्याने रेकॉर्ड तोडत आहे, परंतु एका बाबतीत तो 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' चित्रपटाशी स्पर्धा करू शकला नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 'पुष्पा 2' कोणत्या बाबतीत मागे राहिला?

3/7
वास्तविक, Ormax Media दर आठवड्याला 'टॉप-5 गाण्यांची' यादी प्रसिद्ध करते. या यादीत 'स्त्री 2' मधील 'आज की रात' हे गाणे गेल्या 120 दिवसांपासून म्हणजेच 28 ऑगस्ट ते 25 डिसेंबरपर्यंत पहिल्या क्रमांकावर आहे.

4/7
तमन्ना भाटियावर चित्रित करण्यात आलेले 'स्त्री 2' मधील 'आज की रात' हे गाणे आजपर्यंत लोकांची पहिली पसंती आहे, तथापि, 25 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत 'पुष्पा 2' मधील तीन गाणी - 'किसिक', 'पीलिंग' आणि 'अंगारों'चा समावेश आहे, पण 'आज की रात' सर्वांत वर आहे.

5/7
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट 'स्त्री 2'ने देखील बक्कळ कमाई केली आणि रिलीज झाल्यानंतर तो ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 874 कोटींची कमाई केली.

6/7
'स्त्री 2' हा 2024 चा अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर कॉमेडी चित्रपट होता, जो निरेन भट्ट लिखित आणि मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी संयुक्तपणे निर्मित केला होता. हा मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा भाग आणि 'स्त्री' (2018) चा सीक्वेल होता.

7/7
या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भागही लोकांना खूप आवडला.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement