Tanya Mittal Mother: जे तान्या मित्तलला नाही जमलं, ते तिच्या आईने करून दाखवलं! पहिल्यांदाच कॅमेरासमोर येत सर्वांचीच बोलती बंद केली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tanya Mittal Mother: अनेकांनी तान्या मित्तलला 'फेकू' म्हटलं, तर काहींनी तिची खिल्ली उडवली. पण आता तान्याच्या आईने पहिल्यांदाच कॅमेरासमोर येत सर्वांना झापलं आहे.
मुंबई: यंदाचं बिग बॉसचं सीझन तुफान गाजलं. या सीझनमध्ये ड्रामा, भांडण, मजामस्ती, मैत्री-दुश्मनी सर्व काही पाहायला मिळालं. गौरव खन्ना या पर्वाचा विजेता ठरला असला, तरीही या सीझनमध्ये एकाच नावाची चर्चा होती, ती म्हणजे करोडपती तान्या मित्तल. तान्या मित्तलच्या श्रीमंतीच्या दाव्यांनी शोमधील प्रत्येकाला घाम फोडला.
advertisement
advertisement
तान्याच्या आईने एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, तान्या घरात जे काही बोलली ते १०० टक्के सत्य होतं. तिने सांगितलं, "लोकांना वाटलं ती दिखावा करतेय, पण तिने काहीही लपवलं नाही. आमच्याकडे खरंच महागड्या गाड्या आहेत, मोठं घर आहे आणि हो, तिच्या बोलण्याप्रमाणे घरात सोयीसुविधाही आहेत. पण केवळ तिच्या श्रीमंतीमुळे तिला घरात टार्गेट केलं गेलं, हे पाहून आम्हाला खूप त्रास झाला."
advertisement
advertisement
मुलाखती दरम्यान तान्याची आई भावूक झाली होती. तिने विचारलं, "बिग बॉसच्या मेकर्सना माझा एकच प्रश्न आहे की, फक्त एकाच मुलीला का टार्गेट करण्यात आलं? ती रडली तरी तिला बोललं गेलं, ती हसली तरी तिला टोमणे मारले गेले. तिच्या अंगावर पाणी फेकण्यापर्यंत मजल गेली. जर तिची काही चूक असती तर आम्ही मान्य केलं असतं, पण ती काहीही चुकीचं करत नसताना तिला मानसिक त्रास दिला गेला."
advertisement
advertisement
advertisement









