इतके OTT, कोणत्या ओटीटीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं? तुम्हालाही पडलाय प्रश्न, हा आहे सगळ्यात बेस्ट
- Published by:Priya Lad
Last Updated:
OTT Subscription : ओटीटीचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की कोणतं निवडायचं असा प्रश्न पडतो. तुम्हीही कन्फ्युझ झाला असाल, तुम्हालाही समजत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी.
Netflix, Amazon Prime, Jio Hotstar, ZEE5, SonyLIV, MX Player आणि YouTube यासारखे अनेक पर्याय आहेत. काही ओटीटीवर काही कंटेट फ्रीमध्ये पाहता येतो, तर काहीसाठी सबस्क्रिप्शन लागतं. पण सगळ्यांच ओटीटींचं सबस्क्रिप्शन घेणं शक्य नाही. मग कोणत्या ओटीटीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना? सर्व OTT घेणं गरजेचं नाही, आपल्या गरजेनुसार स्मार्ट निवड करणं महत्त्वाचं आहे.
advertisement
advertisement
advertisement
OTT निवडताना काही गोष्टी तपासल्या पाहिजेत. एकाच अकाऊंटवर अनेक डिव्हाइस जोडता येतात का, मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप? ऑफलाईन डाऊनलोड पर्याय आहे का म्हणजे प्रवासात किंवा इंटरनेट नसताना पाहता येईल. स्पोर्ट्स किंवा इव्हेंट्ससाठी लायव्ह स्ट्रीमिंग आहे का? कंटेट कसा अपडेट होतो, नवीन सीरीज किंवा फिल्म्स वेळेवर येतात का?
advertisement










