'मी सुंदर नसल्यामुळं चित्रपटात नाकारलं...' त्या सिनेमाबाबत ऋतुजा बागवेचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. तिने नाटक आणि मालिकांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नकारांचा सामना करावा लागला होता. नुकतंच तिने याविषयी खुलासा केला आहे.
1/8
ऋतुजा बागवे लवकरच 'सोंग्या' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

advertisement
2/8
ऋतुजा बागवे 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली. पण त्याआधी तिला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला. शिवाय तिचं अनन्या हे नाटक खूप गाजलं होतं. तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.

3/8
काही महिन्यांपूर्वीच अनन्या नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. पण त्यात ऋतुजाची जागा हृता दुर्गुळेने घेतली. नाटक गाजवलं असताना ऋतुजाला चित्रपटात का घेतलं नाही याविषयी तिने खुलासा केला आहे.

4/8
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ऋतुजा म्हणाली, 'माझ्याच नाटकाचा चित्रपट होत असताना मला मी सुंदर दिसत नाही म्हणून मला नाकारलं गेलंयं. या गोष्टी माझ्या वाट्याला खूप आल्या आहेत.'

5/8
ती पुढे म्हणाली, ''नांदा सौख्य भरे' च्या आधी मी हिरोईन मटेरियल दिसत नाही म्हणून मला नाकारलं गेलयं. पण मधल्या काळात सावळया दिसणाऱ्या मुलींना कामं मिळू लागली. मग मालिकेतून ओळख मिळाली.'

6/8
'पण चित्रपटात काम करताना पुन्हा सुंदर दिसत नाही, हिरोईन मटेरियल नाही म्हणून काम मिळालं नाही' असा खुलासा ऋतुजाने केला आहे.

7/8
ऋतुजाला 'तू खूप छान दिसतेस, तुझं त्या नाटकातलं काम छान होतं' असं म्हणत चाहत्यांनी पाठींबा दिला आहे.

8/8
ऋतुजाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर ती लवकरच, 'सोंग्या' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय तिचा 'लंडन मिसळ' हा चित्रपट देखील चर्चेत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement