Smriti Mandhana: पाणावलेले डोळे, दुःखाने सुकला चेहरा! लग्न पोस्टपॉन होताच प्रेमानंद महाराजांना शरण गेला पलाश, आश्रमात काय घडलं?

Last Updated:
Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding: पलाश मुच्छलने नुकतीच वृंदावनमध्ये संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात हजेरी लावली आहे, ज्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दलचे प्रश्न अधिक गडद झाले आहेत.
1/11
मुंबई: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नातील अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित झालेला त्यांचा विवाह स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर ७ डिसेंबरची नवीन तारीख सांगितली जात होती, मात्र आता हे लग्न पुन्हा एकदा पोस्टपोन झाले आहे.

advertisement
2/11
या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात, पलाश मुच्छलने नुकतीच वृंदावनमध्ये संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात हजेरी लावली आहे, ज्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दलचे प्रश्न अधिक गडद झाले आहेत.

3/11
स्मृती आणि पलाशच्या लग्नाची तयारी अगदी मेहंदी आणि हळदीच्या विधींपर्यंत पोहोचली होती. पण, अचानक स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.

4/11
स्मृतीचा भाऊ श्रवण मानधना यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, ७ डिसेंबर २०२५ ही दुसरी तारीखही आता पुढे ढकलण्यात आली आहे आणि लग्नाची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

5/11
स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर काही दिवसांतच पलाश मुच्छलचीही तब्येत बिघडली होती आणि त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

6/11
एकीकडे लग्नाची तारीख पुढे ढकलली जात आहे, तर दुसरीकडे पलाशबद्दल अनेक ऑनलाइन अफवा उठत आहेत. या अफवांमध्ये किती तथ्य आहे, याबद्दल अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. अशातच पलाश मुच्छल थेट संत प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी वृंदावनला पोहोचला.

7/11
२ डिसेंबरच्या सत्संगातील पलाश मुच्छलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तो मास्क लावून सत्संगात बसलेला दिसत आहे.

8/11
वडिलांच्या तब्येतीचे कारण दिले जात असले तरी, काही दिवसांपूर्वी पलाशच्या एका महिलेसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते, ज्यामुळे पलाशवर चीटिंग केल्याचा आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर पलाश आश्रमात पोहोचल्याने त्याच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

9/11
स्मृती आणि पलाश या दोघांपैकी कोणीही या अफवांवर किंवा नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. स्मृती मानधना सध्या तिच्या वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देत आहेत.

10/11
दरम्यान, स्मृतीची जवळची सहकारी आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने स्मृतीला साथ देण्यासाठी ऑस्ट्रेलियातील 'वुमेन्स बिग बॅश लीग' (WBBL) मधून माघार घेतली आहे.

11/11
सध्या दोन्ही कुटुंबीयांनी वैद्यकीय कारणे देऊन लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्याचे सांगितले आहे, पण चाहते मात्र त्यांच्या लग्नाबाबतच्या पुढील घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement