Who is Sreeleela : समांथाला टक्कर देतेय श्रीलीला! कोण आहे नवी नॅशनल क्रश? जिला अल्लू अर्जूनही म्हणाला Cute Girl
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Who is Sreeleela: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2' मधील 'किसिक' हे गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर या गाण्यात आयटम नंबर करताना दिसणाऱ्या श्रीलीलने सगळ्यांनाच तिचे वेड लावले आहे.
पुष्पामध्ये अभिनेत्री समांथने 'ऊ अंटावा' या आयटम साँगमधून तिचा ठसा दाखवून दिला होता. 'पुष्पा 2'मधून समांथाचा पत्ता कट झाला आहे. 'किसिक' गाण्यातून अभिनेत्री श्रीलीला प्रेक्षकांसमोर आली आहे. गाणं रिलीज होताच काही तासात श्रीलीला नॅशनल क्रश झाली आहे. श्रीलीला ही अल्लू अर्जुनची फेव्हरेट आहे. अल्लू अर्जुन तिला क्यूट गर्ल म्हणतो. नेमकी श्रीलीला आहे कोण पाहूयात.
advertisement
'पुष्पा 2' मधील 'किसिक' हे गाणे चाहत्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं ठरलं आहे. अनेक मोठ्या अभिनेत्री या आयकॉनिक स्पेशल नंबरच्या शर्यतीत असताना, निर्मात्यांनी श्रीलीलाच्या रूपात एक नवीन, तरुण आणि फ्रेश चेहरा निवडला. तिच्या बोल्ड डान्स मूव्ह आणि अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सने तिने प्रेक्षकांना वेड लावले आहे. इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement