यात कोणतीही भेसळ नाही, कधी खाल्लीये का? ओरिजनल देशी गाईच्या दुधाची इन्स्टंट आईस्क्रीम
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आईस्क्रीम आवडीने खातात.
advertisement
यामुळे पुण्यातील शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शुद्ध देशी गाईच्या दुधापासून केमिकल मुक्त इन्स्टंट आईस्क्रीम तयार केले आहे. यामध्ये एकूण 12 फ्लेवरच आईस्क्रीम बनवलं जात. ते बनवण्याची नेमकी पद्धत काय आहे याबद्दलच विद्यापीठातील तांत्रिक देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख धीरज कणखरे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
देशी गाईच दूध घेऊन ते अटवतो. त्यामध्ये थोडी साखर मिक्स केली जाते. काही सीझनल फळ कृषी महाविद्यालयातील आहेत ती घेऊन त्या फळाचा गर काढून आईस्क्रीम बनवलं जात. यामध्ये 12 फ्लेवर मिळतात. यामध्ये ओरिओ, बोर्बन, बनाना, चिकू, आंबा, अंजीर, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बदाम, बटर स्कॉच, पान अश्या वेगवेगळ्या फ्लेवरचा समावेश आहे.
advertisement