चिकन-मटणापेक्षा पॉव्हरफूल डाळ, प्रोटिनचा खजिना, महिलांसाठी जणू वरदान!

Last Updated:
चिकन, मटण म्हणजे मांसाहारप्रेमींसाठी जीव की प्राण. चिकन, मटणाची चव भारी असतेच, शिवाय त्यातून शरीराला ताकदही लय भारी मिळते. जर तुम्ही मांसाहारप्रेमी नसाल किंवा कधी मांसाहार करतच नसाल, तर शरीराला चिकन, मटणासारखी ताकद देणाऱ्या शाकाहारी पदार्थांबाबत तुम्हाला माहित असायलाच हवं. अशाच पौष्टिक डाळीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी)
1/7
वरण, भात हे आपल्या जेवणातले प्रमुख पदार्थ. आपण डाळीपासून केवळ वरणच नाही, तर विविध पदार्थ बनवून खाऊ शकतो. मुगाची डाळ तर प्रोटिन्सने परिपूर्ण असते. ज्यामुळे शरीर छान ऊर्जावान राहतं. विशेषत: मांसाहार न करणाऱ्या लोकांनी पोषक तत्त्व मिळवण्यासाठी ही डाळ खायलाच हवी, असं म्हणतात.

advertisement
2/7
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, मुगाच्या डाळीत भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचनसंस्था उत्तम राहते. परिणामी बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, इत्यादी त्रास होत नाही. 

3/7
मुगाच्या डाळीत असलेल्या व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे विविध आजारांपासून शरीराचं रक्षण होतं. 

4/7
मुगाच्या डाळीत असलेलं आयर्न आणि फोलेट गरोदर महिलांसाठी आणि बाळासाठी पोषक ठरतं. परंतु गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार घ्यावा. 

5/7
वजन कमी करायचं असेल तर आहारात मूग डाळीचा समावेश आवर्जून करावा. ही डाळ लो-कॅलरी आणि हाय-प्रोटिन देणारी असते. ज्यामुळे बराच वेळ पोट भरलेलं राहतं. सारखी भूक न लागल्यामुळे वजन नियंत्रित राहतं. 

6/7
मूग डाळीतील अँटिऑक्सिडंट आणि हेल्दी फॅटमुळे कोलेस्ट्रॉल बॅलन्स राहतं. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. 

7/7
मूग डाळीतून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा दूर होतो. आपण मूग डाळीचं वरण, खिचडी, स्प्राउट, सूप किंवा पराठे बनवून खाऊ शकता. कोणत्याही पद्धतीनं खाल्ली तरी मूळ डाळ शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement