Diwali Padwa 2024 Wishes : दिवाळी पाडवा आणखी गोड करेल; पती-पत्नीसाठी दिवाळी पाडव्याचे शुभेच्छा मेसेज
- Published by:Priya Lad
Last Updated:
दिवाळी पाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. पती-पत्नीच्या नात्याचा हा खास दिवस असतो. या खास दिवशी तुमच्या जोडीदाराला देण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज.
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात, या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्म्य आहे, सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement