Fish : तुम्ही बाजारातून आणलेले मासे ताजे आहेत की शिळे? कसे ओळखालं?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मांसाहार हा अनेकांचा आवडता विषय आहे. भारतात प्रामुख्याने लोक मांसाहारामध्ये चिकन, मटण आणि मासे इत्यादींचे सेवन करतात. भारताच्या तीनही बाजू या
समुद्राने वेढलेल्या असून भारताला तब्बल 7516.6 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असते. माशांमध्ये विविध प्रकारचे पोषकतत्व आढळल्याने त्यांचे सेवन हे शरीरासाठी आरोग्यदायी ठरते. परंतु बऱ्याचदा बाजारात मासे खरेदीसाठी गेल्यावर तेथे शिळे आणि ताजे मासे ओळखण्यात गल्लत होते. तेव्हा ताजे मासे कसे ओळखायचे याच्या सोप्या टिप्स माहिती करून घ्या.
मासे ताजे आहेत की शिळे हे ओळखण्यासाठी सर्वात सोपी टीप म्हणजे माशांचा वास. प्रत्येक माशाला वास येतच असतो. परंतू तो वास दुर्गंध तर नाहीना हे ओळखणे गरजेचे आहे. माशांमधून फारच कुबट वास येत असेल तर ते मासे हे शिळे आहेत असे समजावे. तसेच ज्यामाशांना घाणेरडा वास येत असेल असे मासे खाण्याची चूक करू नका कारण यामुळे तुम्हाला फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement