Kitchen Tips : पावसाळ्यात गुळाला ओलाव्यापासून ठेवा दूर, वापरा 'हे' सोपे उपाय
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळ्यात हवामानात दमटपणा वाढल्यामुळे गुळ, साखर, मीठ इत्यादी पदार्थांना पाणी सुटते, ओलावा येतो. अशास्थितीत गुळाला ओलाव्यापासून दूर ठेवण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊयात.
गूळ कॉटन किंवा मलमल कपड्यात बांधून ठेवा : पावसाळ्यात गुळाला थोडीशी जरी हवा लागली तरी ते लगेच खराब होते पाणी सुटते. पावसाळ्यात गूळ साठवायचा असेल तर गुळाला मलमल किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा. यामुळे कॉटन किंवा मलमलचा कपडा गुळातील ओलावा शोषून घेईल. तसेच गूळ कापडात घट्ट बांधल्यामुळे बाहेरील हवेचा त्याच्याशी संपर्क होणार नाही.
advertisement
कडुलिंब किंवा आंब्याची पाने : गुळाला ओलावा किंवा कीड लागू नये यासाठी गुळाच्या डब्यात कोरडी कडुलिंब किंवा आंब्याची पाने ठेवा. यापानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे बॅक्टेरिया आणि फंगसपासून संरक्षण करण्यास मदत करते. कडुलिंब किंवा आंब्याची पाने गुळात ठेवण्यापूर्वी ती पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असल्याची खात्री करा.
advertisement
advertisement
advertisement









