अक्षय खन्नाचा 'धुरंधर'मधील डान्स ओरिजिनल नाही, वडिलांनाच केलंय कॉपी; हा घ्या प्रुफ, VIDEO

Last Updated:

'धुरंधर' मध्येही अक्षय खन्नाने त्याच्या अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षय खन्नाचा एक सॉलिड डान्स या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या या डान्सची देखील खूप चर्चा होतेय.

News18
News18
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीर सिंहसह तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमानं रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. रणवीर मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर आला आहे. एकीकडे रणवीर तर दुसरीकडे अभिनेता अक्षय खन्ना याने सिनेमात धुराळा उडवून दिला आहे. अक्षय खन्नासमोर रणवीर फिका पडतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे.
'छावा' या सिनेमात अक्षय खन्नानं साकारलेला औरंगजेब खूप लोकप्रिय झाला. त्याच्या अभिनयाचं करावं तितकं कौतुक आहे. त्यानंतर आता 'धुरंधर' मध्येही अक्षय खन्नाने त्याच्या अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षय खन्नाचा एक सॉलिड डान्स या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या या डान्सची देखील खूप चर्चा होतेय.
advertisement
FA9LA या अरबी गाण्यावरील त्याचा नॉन-कोरिओग्राफ केलेला डान्स सिनेमाचा प्लस पॉइंट ठरतोय. अक्षय खन्नाच्या डान्सच्या क्लिप्स इंस्टाग्राम रील्स, टिकटॉक एडिट आणि ट्विटर थ्रेडवर व्हायरल झाल्या. चाहत्यांनी त्याच्या सहजतेचं आणि स्क्रीन प्रेझेन्सचं कौतुक केलं.
अक्षयचा डान्स व्हायरल होताच तो त्याच्या वडिलांचा म्हणजेच दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांची आठवण चाहत्यांना आली आहे. अक्षय खन्नानं धुरंधरमध्ये वडिल विनोद खन्ना यांच्या डान्स स्टाइल कॉपी केल्याचं बोललं जात आहे. 1989 साली लाहोरमध्ये झालेल्या एका चॅरिटी कॉन्सर्टमधील विनोद खन्ना यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा कार्यक्रम इम्रान खानच्या शौकत खानम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलसाठी होता. व्हिडिओमध्ये विनोद खन्ना रेखा, इम्रान खान आणि क्रिकेटर जावेद मियांदाद यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत.
advertisement
अक्षय खन्नाचा धुरंधरमधील डान्स व्हायरल झाल्यानंतर त्याची तुलना त्याचे वडिल विनोद खन्ना यांच्या खास डान्स स्टेप्सशी केली जात आहे.  सोशल मीडिया युझर्सनी दोन्ही डान्सची तुलना केली. अक्षय खन्नाने कदाचित त्याच्या वडिलांच्या डान्स स्टेप्सची कॉपी केली नसेल पण नकळत त्याच्या वडिलांची स्टाईल स्वीकारल्याचं दिसत आहे.
advertisement
advertisement
अक्षय खन्नाचा हा डान्स कोरिओग्राफ केलेला नाही त्यामुळे तो पाहताना प्रेक्षकांना अधिक आपला आणि हृदयस्पर्शी वाटतो. धुरंधर हा अक्षय खन्नाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा मानला जात आहे. छावा सिनेमामुळे अक्षय खन्नाला त्याच्या उतार वयात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर धुरंधरमध्ये अक्षय खन्ना आपल्या अभिनयाची जादू दाखवून देताना दिसतोय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अक्षय खन्नाचा 'धुरंधर'मधील डान्स ओरिजिनल नाही, वडिलांनाच केलंय कॉपी; हा घ्या प्रुफ, VIDEO
Next Article
advertisement
ED Raid Baramati : बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठी अपडेट
बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ
  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

View All
advertisement