पाण्यानेही खराब होत नाही ही रांगोळी, एकदा काढा अन् कधीही वापरा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सण आर्ट रांगोळी ही पोर्टेबल असून एकदा काढली की कधीही वापरता येऊ शकते.
advertisement
advertisement
सोनाली अग्रवाल यांनी आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून आगळ्यावेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तयार केल्या आहेत. ज्या पाण्याने खराब होत नाही आणि रांगोळ्या पोर्च मध्ये, जमिनीवर, भिंतीवर, टेबलवर सहज सजवल्या जातात. या प्रकारची रांगोळी बनविण्यासाठी ओ.एच.पी शीट चा वापर केला जातो. त्यावर बनलेल्या रांगोळ्या ठेवाव्या लागतात.
advertisement
यामध्ये तीन प्रकारच्या लेयर असतात. त्यांना सुकण्यासाठी 7-8 तासांचा कालावधी लागतो आणि पाण्याने सुद्धा खराब होत नाही. वर्षानुवर्षे या रांगोळ्या साठवून ठेऊ शकतो. या रांगोळ्यांचं वैशिष्ट्ये म्हणजे या पोर्टेबल असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. भिंतीवर, डायनिंग टेबलवर सहज काही मिनिटांत सजविण्यात येते.
advertisement
सोनाली या रांगोळ्याचे ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षनाचे वर्गही घेतात. त्यांच्याकडे आतापर्यंत 100 च्या वर महिला विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. सोनाली यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या महिला विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून त्या 50-60 हजार रुपये कमावत आहेत. या परीक्षण वर्गात 62 वर्षा पर्यंतच्या महिला सुद्धा आहेत ज्या रांगोळीचे प्रशिक्षण घेत आहेत.
advertisement
advertisement










