Wardha: नळातून येऊ लागले भयानक जीव आणि तुकडे, वर्ध्यातील भयानक घटनेचे PHOTOS

Last Updated:
गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्या जातो. मात्र, दोन वर्षांपासून टाकीतून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (नरेंद्र मते, प्रतिनिधी )
1/7
राज्यात सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. अशातच वर्ध्यामध्ये पिण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मागील दोन वर्षांपासून दुषित पाणी येत असल्यामुळे  गावकारी त्रस्त झाले आहे.

advertisement
2/7
 वर्ध्याच्या वायगाव बैलमारे इथं ही घटना घडली आहे. समुद्रपूर तालुक्यातील वायगाव बैलमारे गावात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मासांचे तुकडे येत असल्याचे दिसून आले. गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्या जातो.

3/7
 मात्र, दोन वर्षांपासून टाकीतून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इतकेच नव्हे तर नळातून विविध प्राण्यांच्या मासांचे तुकडे येत असल्याचेही पुढे आले आहे.

4/7
गावकऱ्यांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, बीडीओ यांच्याकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही.

5/7
 ग्रामपंचायतीकडून पाण्याच्या टाकीची योग्य देखभाल केली जात नाही. साफसफाई होत नाही. जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या निधीचा योग्य वापर ग्रामपंचायत कडून करण्यात येत नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

6/7
गावकऱ्यांना होत असलेल्या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांमध्ये गॅस्ट्रो, हगवण, उलटी, मळमळ आदी जीवघेणे आजार जडले आहे. यामुळे गावातील लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका असून शासनाने तात्काळ उपयोजना करत शुद्ध पाणी देण्याची मागणी केली जात आहे.

7/7
तहसीलकडे वारंवार तक्रारी करुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेत मासांचे तुकडे असलेले पाणी घेऊन धडक देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement