Balasaheb Thackeray Death Anniversary : कॅनव्हॉसवरील ठाकरेंचे फटकारे! बाळासाहेबांची राजकीय भाष्य करणारी व्यगंचित्रे
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) स्मृती दिन. बाळासाहेबांचं वयाच्या 86 व्या वर्षी 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झालं. देशातील स्पष्टवक्ते, सडेतोड भाषण करणारे नेते म्हणून आजही बाळासाहेबांची आठवण काढली जाते. संपूर्ण आयुष्यात बाळासाहेबांनी सरकारी पद स्वीकारलं नाही आणि निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब हे एक व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कुंचल्यातून निघालेल्या फटकाऱ्यांनी देशातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य केलं.
advertisement
फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून बाळासाहेबांनी 1960 मध्ये स्वत: चं मार्मिक हे राजकीय साप्ताहिक सुरु केलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचे वडिल प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आघाडीचे नेते होते. त्यांच्या विचारांचा बाळासाहेबांवर खूप मोठा प्रभाव होता. 1949 मध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या या कार्टूनमध्ये त्यांनी काश्मीरमधील युद्धबंदीवर टीका केली आहे.
advertisement
मुंबईतील वाढणाऱ्या परप्रांतीयांच्या प्रभावावर टीका करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांवरही आपल्या व्यंगचित्रांतून भाष्य केलं आहे. 2 9 नोव्हेंबर 1948 ला महागाईवर बाळासाहेबांनी काढलेलं हे कार्टून प्रसिद्ध झालं होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


