HSC- SSC Exam 2026: दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक इथं पाहा PHOTOS
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
HSC- SSC Exam Date Announced: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांची मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांची मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या (HSC SSC Exam Dates) शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
advertisement
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात तर, दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
advertisement
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात.
advertisement
तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायित अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षांचे देखील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची तोंडी परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. तर दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
advertisement
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
advertisement