RBI ने लॉन्च केलंय आपलं WhatsApp चॅनल! प्रत्येक अपडेट मिळेल डायरेक्ट

Last Updated:
RBI WhatsApp channel : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच एक WhatsApp चॅनेल सुरू केले आहे. ज्याद्वारे तुम्ही बँकेची लेटेस्ट माहिती आणि अपडेट्स थेट मिळवू शकता. तुम्हालाही या चॅनेलमध्ये सामील व्हायचे असेल, तर ते कसे करायचे ते येथे जाणून घ्या.
1/6
RBI WhatsApp channel Launched : भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच लोकांना आर्थिक माहिती अधिक सहजपणे पोहोचवण्यासाठी एक अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू केले आहे. खरंतर, याद्वारे आरबीआय महत्त्वाचे बँकिंग अपडेट्स आणि आर्थिक बातम्या थेट लोकांना सोप्या पद्धतीने शेअर करू इच्छिते. जेणेकरून ते दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचू शकेल. देशभरातील लोक मध्यवर्ती बँकेने शेअर केलेला QR कोड स्कॅन करून चॅनेलमध्ये सामील होऊ शकतात.

advertisement
2/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील व्हेरिफाय अकाउंटवरुन महत्त्वाची आर्थिक माहिती प्रत्येकासाठी, ते कुठेही राहत असले तरी, सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत.

3/6
लोकांना जागरूक करण्यासाठी उचललेली पावले :आरबीआयच्या मते, यापूर्वीही त्यांनी जनतेला जागरूक करण्यासाठी टेक्स्ट मेसेज, दूरदर्शन आणि डिजिटल जाहिराती यासारख्या विविध माध्यमांचा वापर केला आहे.

4/6
सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि फसवणूक रोखण्याबाबत जागरूकता संदेश पसरवण्यासाठी मध्यवर्ती बँक या चॅनेलचा वापर करेल. याशिवाय, लोकांना त्यांच्या बँकिंग अधिकारांची आठवण करून देण्यासाठी आणि धोरणांमधील बदलांबद्दल माहिती देण्यासाठी देखील याचा वापर केला जाईल. चुकीच्या माहितीविरुद्धच्या लढाईत व्हाट्सअॅप चॅनेल एक प्रभावी साधन बनेल, सोशल मीडियावर पसरणारी आर्थिक चुकीची माहिती कमी करेल आणि ग्राहकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल अशी आशा आरबीआयला आहे.

5/6
कसं जॉइन व्हायचे? : RBI ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेला QR कोड स्कॅन करा. QR कोड तुम्हाला थेट आरबीआय व्हॉट्सअॅप चॅनेलवर घेऊन जाईल. चॅनेल सबस्क्राइब करण्यासाठी "जॉइन" वर क्लिक करा. सामील झाल्यानंतर, तुम्हाला आरबीआयच्या व्हेरिफाय व्हॉट्सअॅप अकाउंटवरुन अपडेट्स मिळण्यास सुरुवात होईल.

6/6
RBIचे अधिकृत WhatsApp अकाउंट 9999 041 935 या बिझनेस नंबरद्वारे चालवले जाते. यूझर्सना सल्ला दिला जातो की, त्यांनी योग्य चॅनेल फॉलो करत असल्याची खात्री करण्यासाठी खात्याच्या नावाशेजारी असलेले व्हेरिफाय चिन्ह तपासावे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement