एका क्लिकवर कॅब बुकिंग; सरकारची नवी सेवा नागरिकांसाठी ठरणार बजेट-फ्रेंडली पर्याय

Last Updated:
Government Taxi Service : भारत टॅक्सी अ‍ॅप देशातील पहिले सरकारी टॅक्सी सेवा अ‍ॅप आहे. झिरो-कमिशन मॉडेलवर चालणारी ही सेवा दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली असून प्रवाशांना स्वस्त आणि विश्वासार्ह वाहतूक आणि ड्रायव्हर्सना पूर्ण कमाई मिळेल.
1/7
 भारत सरकारने प्रत्येक नागरिकांना परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह प्रवासासाठी मोठे पाऊल उचलत देशातील पहिले सरकारी मालकीचे टॅक्सी सेवा अ‍ॅप भारत टॅक्सी हे सुरू केले आहे.

advertisement
2/7
 ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या खाजगी टॅक्सी सेवांमुळे अनेक प्रवाशांना भाडे नाकारणे, अतिरिक्त पैसे मागणे, असभ्य वर्तन अशा समस्या वारंवार होत होत्या. या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा आणि प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक सेवा मिळावी या उद्देशाने सरकारने भारत टॅक्सी प्रकल्प राबवला आहे.

3/7
 ही सेवा सध्या दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून जानेवारी 2026 मध्ये देशभरात पूर्ण क्षमतेने लाँच होणार आहे. या अ‍ॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे झिरो-कमिशन मॉडेल.

4/7
 प्रवाशांकडून जेवढे भाडे मिळेल त्यातील 100% रक्कम थेट टॅक्सी चालकांच्या खात्यात जमा होईल. यामुळे चालकांचा उत्पन्न वाढेल आणि सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 51,000 हून अधिक ड्रायव्हर्सनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे, ही या उपक्रमाची मोठी ताकद आहे.

5/7
 भारत टॅक्सी हे सहकार तत्त्वावर आधारित मॉडेल आहे. सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड या बहु-राज्य सहकारी संस्थेद्वारे ही सेवा चालवली जाणार आहे. अमूल, इफको, नाफेडसह आठ प्रमुख सहकारी संस्थांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. त्यामुळे ही सेवा केवळ वाहतूकपुरती मर्यादित नसून, देशातील सहकार क्षेत्रालाही बळ देणारी ठरणार आहे.

6/7
 अ‍ॅपमध्ये वाहन ट्रॅकिंग, पूर्ण भाडे पारदर्शकता, 24/7 ग्राहक सेवा, बहुभाषिक इंटरफेस अशी आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सेवेचे सॉफ्ट लाँच करण्यात आले असून नंतर दिल्ली आणि राजकोट येथे ड्रायव्हर अ‍ॅपही लाँच झाले आहे.

7/7
 सध्या भारत टॅक्सी अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध असूनओला-उबरच्या मक्तेदारीला तीव्र स्पर्धा देणारी ही सरकारी सेवा देशभरातील प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि पारदर्शक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement