Mumbai Rain: मुंबई-ठाण्यात 24 तासांत बदलणार हवा, कोकणात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Weather: मुंबई, ठाण्यासह उपनगरांत गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवण्याचा अंदाज आहे.
1/5
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पावसाचा जोर आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये देखील गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र पुन्हा हवापालट होणार असून हवामानात मोठे बदल जाणवतील. मुंबईसह कोकणातील अवकाळी संकट संपणार आहे.

advertisement
2/5
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणात हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे. आज मुंबईत आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवारपासून हवामान कोरडे राहील. त्यामुळे पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आज कमाल तापमान 30 अंशांच्या घरात राहील.

3/5
ठाणे जिल्ह्याला गुरुवारी वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. आज मात्र ठाण्याला कोणताही अलर्ट नाही. पण पुढील 2 दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहून तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर आहे. आज मात्र पालघरला कोणताही अलर्ट नाही. पण पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. या काळात आकाश अंशत: ढगाळ राहणार असून कमाल तापमान 34 अंशांवर राहील.

5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील हवामानात बदल जाणवतील. आजपासून पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु, या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. तरीही बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement