Mumbai Rain: कमी दाबाचा पट्टा ठरणार त्रासदायक! मुंबई-ठाण्यात हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही काळात कोकणात पावसाचा जोर कायम आहे. आज मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात मान्सूनने जोर धरलेला असून, आज 7 जुलै रोजी कोकण किनारपट्टीपासून मुंबई महानगर क्षेत्रापर्यंत ढगाळ वातावरण राहील. तसेच दिवसभर पावसाचा रिपरिप सुरू राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे जोरात वाहत असून, उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.
advertisement
मुंबईत आज सकाळपासूनच आकाश पूर्णतः ढगाळ असून काही भागांमध्ये हलक्या सरींची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर थोडाफार वाढण्याची शक्यता असून, सायंकाळी काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागानुसार, मुंबईचे कमाल तापमान 29–30 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. तर आज ताशी 55 किमी वेगाने वारे वाहणार असून हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
ठाणे शहरात आज दिवसभरात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील प्रमुख भाग – कल्याण, डोंबिवली, मुलुंड-ठाणे सीमेवरील क्षेत्र, ठाणे पश्चिम, नौपाडा, वागळे इस्टेट आणि भिवंडी परिसर – येथे सकाळी हलक्या सरी झाल्या आहेत. तर, दुपारी व सायंकाळी पावसाचा जोर थोडा वाढण्याचा अंदाज आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागांत पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. आज पुन्हा रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे. समुद्राला उधाण असून, मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह काही भागांत जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.