जीव घाबरलेला आवाजात भीती, त्या 30 सेकंदात काय घडलं? A11 लकी प्रवाशानं सांगितला थरारक अनुभव
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एअर इंडियाचे विमान AI-171 अहमदाबादहून लंडनला जाताना कोसळले, यात 241 प्रवासी मृत्युमुखी पडले, फक्त विश्वास कुमार वाचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळाला भेट देऊन विश्वास यांची विचारपूस केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पुढच्या काही सेकंदात विमानात हिरवे आणि पांढरे दिवे लागले. त्यानंतर विमानाचा वेग वाढला, विमान थेट एका हॉस्टेलमध्ये घुसलं. विमान हॉस्टेलवर आदळल्यानंतर काहीच समजलं नाही. मी पटकन क्षणाचाही विलंब न करता जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मी ज्या बाजूला होतो, ती बाजू हॉस्टेलवर आदळली नव्हती. हॉस्टेलच्या ग्राउंड फ्लोरच्या, म्हणजे खालील बाजूस ती आदळली होती. इतरांबद्दल मला माहीत नाही, पण मी जिथे होतो, ती खालची बाजू होती.
advertisement
विमानाचा बाहेरचा भाग थोडा मोकळा होता. "जेव्हा माझा दरवाजा तुटला आणि मी बाहेर पाहिले, तेव्हा थोडी जागा दिसली. मला वाटले की मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकेन. मी प्रयत्न केला आणि बाहेर पडलो. कारण दुसऱ्या बाजूला इमारतीची भिंत होती, तिकडून कदाचित कोणीही बाहेर पडू शकले नसेल, कारण तिकडेच पूर्ण क्रॅश झाला होता.
advertisement
मी जिथे होतो, तिथे थोडी जागा होती. तरीही मला माहीत नाही मी कसा वाचलो, कारण माझ्या डोळ्यासमोरच दोन एअर होस्टेस आणि अंकल-आंटी अडकले होते. या दुर्घटनेत विश्वास यांच्या डाव्या हाताला आगीमुळे थोडी भाजली आहे. अपघात झालेल्या ठिकाणाहून ते पायीच बाहेर पडले आणि नंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले.
advertisement