Weather Alert: श्रावणाची अतिमुसळधार सुरुवात, पुणे ते कोल्हापूर झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 72 तास काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1/7
राज्यात श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर वाढला आहे. आज 25 जुलै रोजी कोकण, पूर्व विदर्भासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना दक्षतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे घाट माथ्यास रेड अलर्ट, तर कोल्हापूर घाटमाथ्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

advertisement
2/7
मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 1.9 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 26.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा रेड अलर्ट दिला आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस झाला. सातारा परिसरामध्ये 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर घाट भागात पावसाचा जोर जास्त राहणार असून या भागाला दक्षतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 25.2 अंश नोंदवले गेले. आज कोल्हापुरात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा 29.2 अंशावर पोहचला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 31 अंशावर राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर कमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
पश्चिम महाराष्ट्रात श्रावणाची सुरुवात मुसळधार पावसाने होणार आहे. पुणे ते कोल्हापूर पावसाचा जोर कायम आहे. काही भारात रेड अलर्ट असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. नद्या, ओढ्यांना पाणी वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी रस्ते खचण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना 72 तास दक्षता घ्यावी लागेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement