Weather Alert: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पुण्यासह 3 जिल्ह्यांना झोपडणार, हवामान विभागाचा हायअलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा पुणे ते कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागात ऑरेंज अलर्ट असणार आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी राहिला असून धरणक्षेत्रात मात्र पावसाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस राहिले. आज पुन्हा पुणे घाटमाथ्यास जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे. सातारा परिसरामध्ये 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाटमाथ्यावर मात्र मुसळदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement