आधी लिव-इन मग लग्न, विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री; 44 वर्ष करतेय सुखाचा संसार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शिक्षण घेत असताना ही अभिनेत्री अशा अभिनेत्याच्या प्रेमात पडली जो आधीपासून विवाह होता. त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? आज त्यांचा 44 वर्षांचा सुखी संसार आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी विवाहित किंवा घटस्फोटित अभिनेत्याशी लग्न केलं. काहींचे संसार मोडले तर काहींनी ते टिकवले. अशीच एक अभिनेत्री जी एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली. शिक्षण घेत असताना तिला तो आवडला. पुढे अशा गोष्टी घडल्या की दोघे लिव-इनमध्ये राहू लागले. त्यांनी पुढे लग्न केलं आणि आज त्यांचा 44 वर्षांचा सुखी संसार आहे.
'गोलमाल 3', 'खूबसूरत', 'मिर्च मसाला', 'जाने तू या जाने ना' आणि 'एक मैं और एक तू' यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने 1983 साली 'मंडी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यांना खरी ओळख छोट्या पडद्यावर मिळाली. 1980च्या दशकात डीडी नॅशनलच्या 'इधर-उधर' या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
advertisement
या ज्येष्ठ अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच यशस्वी होते. त्या कॉलेजच्या दिवसांपासूनच रंगभूमीवर सक्रियपणे कार्यरत होत्या. 1975 साली अभिनेत्री पुण्यातील एफटीआयआय (FTII) मध्ये शिकत होत्या. याच काळात तिची भेट अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याशी झाली. आपण बोलत आहोत ते अभिनेते म्हणजेच रत्ना पाठक शाह यांच्याविषयी.
advertisement
एका नाटकात एकत्र काम करत असताना रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह एकमेकांच्या जवळ आले आणि हळूहळू त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. जेव्हा रत्ना पाठक नसीरुद्दीन शाह यांना भेटली तेव्हा ते आधीच विवाहित होते. जरी ते आपल्या पत्नीसोबत राहत नसले तरी त्यांनी तिला कधीही घटस्फोट दिला नव्हता.
रत्ना पाठक यांच्या मते, त्यांचे वैवाहिक जीवन सोपे नव्हते. नसीरुद्दीन शाह विवाहित होते आणि तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे होते. नसीरुद्दीन यांची पहिली पत्नी एक पाकिस्तानी महिला होती जी त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठी होती. जेव्हा नसीरुद्दीन शाह यांचा डिवोर्स होत होता त्या काळात ते रत्नाला भेटले. आपले नाते तुटल्याच्या दुःखात असलेल्या नसीरुद्दीनला रत्नामध्ये दिलासा मिळाला. तो रत्नाच्या खूप जवळ आला.
advertisement
रत्ना पाठकला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याचे नसीरुद्दीन शाहचे प्रयत्न अयशस्वी ठरले, कारण पोटगीमुळे त्याच्या पहिल्या पत्नीपासूनचा घटस्फोट लांबला होता. दुसरा कोणताही पर्याय न उरल्याने, त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. रत्ना आणि नसीरुद्दीन यांनी 1982 मध्ये लग्न केले. दोघांना दोन मुलं आहे. दोघांचा 44 वर्षांचा सुखी संसार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 7:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी लिव-इन मग लग्न, विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री; 44 वर्ष करतेय सुखाचा संसार









