आजचं हवामान: सूर्याचा पारा चढला, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा आस्मानी संकट, पुढील 24 तासांचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असतानाच पुन्हा नव्या संकटाची शक्यता आहे.
1/7
राज्यात उष्णतेचा पारा सतत चढत असून तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान गेले आहे. आज 10 एप्रिल रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट दिवा आहे. तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासातील पश्चिम महाराष्ट्रातील हवामान व तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/7
राज्यात 9 एप्रिल रोजी अकोला येथे उच्चांकी 44.1 अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या होरपळीत आता वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. तापमान वाढ कायम असून आयएमडीने रहिवाशांना सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

3/7
आज पुण्यातील कमाल तापमान 41तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. कोल्हापूरातील वातावरणात उष्मा कमालीचा जाणवत असून येथील कमाल तापमान 38 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.

4/7
सोलापूर जिल्ह्यातील उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होत आहे. येथील कमाल तापमान 41 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

5/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहिल. जिल्ह्यात उकाडा वाढत असून दुपारनंतर ढगाळ वातावरणाने गारवा निर्माण होईल.

6/7
सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 असेल इतके राहण्याचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यात देखील दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

7/7
नैऋत्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रणालींमुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुन्हा हवापालट होण्याची शक्यता आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement