अक्षय्य तृतीयेला जुळून येणार 3 शुभ योग, सोनं खरेदीचा मुहूर्त अजिबात चूकवू नका!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीय सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी पाळलेल्या उपवासातून आणि केलेल्या दानातून भरपूर पुण्य मिळतं असं म्हणतात. शिवाय यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक अत्यंत शुभ संयोग निर्माण होणार आहे. यंदाची अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्रात आहे, शिवाय याच दिवशी परशुराम जयंती साजरी होईल आणि याच दिवशी गंगा देवी प्रकट झाली होती असं ज्योतिषी सांगतात. त्यामुळे ही अक्षय्य तृतीया कशी खास आहे, जाणून घेऊया. (विक्रम झा, प्रतिनिधी / पूर्णिया)
advertisement
advertisement
advertisement
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्वात आधी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी. त्यानंतरच दिवसभरातील कामं करावी, असं ज्योतिषांनी आवर्जून सांगितलं. तसंच या दिवशी अन्नधान्य, वस्तू, आणि पाण्याचं भांड दान करण्यालाही विशेष महत्त्व असतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)