मोदींनीही केलं होतं कौतुक, राम आएंगे फेम गायिकेचं आलं नवीन गीत, तुम्ही ऐकलं का?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
स्वाती मिश्रा या गायिकेचे आणखी एक नवीन रामावरचे गीत सोशल मीडियावर आले आहे. हे गाणे खूप वेगाने व्हायरल होत आहे. पीएम मोदी यांनीही स्वाती मिश्राच्या आवाजाचे कौतुक केले होते. 'राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी...' या गाण्याने स्वाती मिश्राला संपूर्ण देशात ओळख मिळाली. (विशाल कुमार/छपरा, प्रतिनिधी)
छपरा भिखारी ठाकुर यांची भूमी आहे. भिखारी ठाकुर हे आपल्या लोकगीतांच्या तसेच नाटकांच्या माध्यमातून समाजातील वाईट चालीरितींवर प्रहार करायचे. आता छपरा येथील कन्या स्वाती मिश्रा आपल्या भजनांच्या माध्यमातून देश आणि जगामध्ये नाव कमावत आहे. राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी या गाण्याने ती संपूर्ण देशात चर्चेत आली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement