Akshaya Tritiya 2024 : आता गरिबीचे दिवस संपणार, धनयोग करेल तुम्हाला श्रीमंत, पैसेच पैसे येईल!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
या दिवशी महत्त्वाचे ग्रहयोग होत आहेत. त्यामुळे हा दिवस आणखीच शुभ फलदायी ठरणार आहे. या दिवशी विशिष्ट ग्रहयोगांमुळे सर्व राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतील
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी शुभकार्यं आवर्जून करतात. दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी महत्त्वाचे ग्रहयोग होत आहेत. त्यामुळे हा दिवस आणखीच शुभ फलदायी ठरणार आहे. या दिवशी विशिष्ट ग्रहयोगांमुळे सर्व राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतील; पण तीन राशींसाठी ही अक्षय्य तृतीया खऱ्या अर्थाने मालामाल करील.
advertisement
विवाहासाठी अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता विवाह, सोनं-चांदी खरेदी आणि नवीन कामाला प्रारंभ केला जातो. यंदा शुक्राचा अस्त असल्याने अक्षय्य तृतीयेला विवाह होणार नाहीत. अक्षय्य तृतीयेला आखा तिज पर्व असं म्हणतात. या दिवशीलक्ष्मी मातेची विधिवत पूजा करणं आणि सोनं-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला अर्थात 10 मे रोजी अनेक शुभ योग होत आहेत. या दिवशी गजकेसरी आणि धनयोग होत आहे.
advertisement
तसंच या दिवशी सूर्य आणि शुक्राची मेष राशीत युती होत आहे. त्यामुळे शुक्रादित्य योग होत आहे. मीन राशीतल्या मंगळ-बुध युतीमुळे धनयोग होत आहे. शनी कुंभ राशीत असल्याने शश योग, मंगळ उच्च रास मीनेत असल्याने मालव्य राजयोग होत आहे. अक्षय्य तृतीयेला चंद्र वृषभ राशीत असून चंद्र-गुरू युतीमुळे गजकेसरी योग होत आहे. त्यामुळे यंदाची अक्षय्य तृतीया विशेष आहे. हा सण मेष, वृषभ आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल.
advertisement
advertisement
वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय्य तृतीया शुभ फलदायी आहे. धनलाभाचे जोरदार योग आहेत. लक्ष्मीमातेच्या कृपेमुळे प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुमचं कौतुक होईल. नोकरीत प्रगती होईल. पदोन्नती होऊन मोठं पद मिळू शकतं. वेतनवाढदेखील मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, तसंच व्यवसायात नफा कमावण्यासाठी चांगली संधी मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल.
advertisement
advertisement