मारुतीरायाचं बळ मिळेल, हनुमान जयंतीला करा उपाय! संकटं थाऱ्याला नाही टिकणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्या व्यक्तीच्या पाठीशी मारुतीरायांचा आशीर्वाद असतो तिला कोणत्याच दु:खाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे. त्या व्यक्तीचं जीवन सुख आणि सौभाग्याने परिपूर्ण असतं. म्हणूनच हनुमान जयंतीला मारुतीरायांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात, चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा हा उत्सव मंगळवार, 23 एप्रिल रोजी साजरा होईल. जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय करावे, ज्यामुळे आयुष्यात सुख, समृद्धी येते. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
आपल्यामागे कोर्ट-कचेरीच्या कामांची ओढाताण असेल तर हनुमान जयंतीला मारुतीरायांना तुळशीची माळ आणि लाडू अर्पण करा. तसंच चमेलीच्या तेलाचा दिवा लावणंही शुभ ठरेल. या दिवशी सातवेळा हनुमान चालिसेचं पठण करावं. यामुळे आपल्यामागे लागलेल्या कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं.
advertisement
आपल्या कुटुंबात वाद-विवाद असतील तर कुंकवात तेल मिसळून त्याने घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढा. हा उपाय हनुमान जयंतीपासून चाळीस दिवस केल्यास घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं अशी मान्यता आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)