IPL च्या 6 कॅप्टनना टीम इंडियात जागा नाही, T20 वर्ल्ड कपचं तिकीटही कापलं! सिलेक्शनचे नियम आहेत तरी काय?

Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला मंगळवार 9 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून या सीरिजकडे पाहिलं जात आहे.
1/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 आणि न्यूझीलंडविरुद्धच्या 5 अशा 10 टी-20 मॅच खेळल्यानंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणारेच खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्येही निवडले जातील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

advertisement
2/8
टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणाऱ्या 15 खेळाडूंची निवड झाली, तर आयपीएल टीमच्या 6 कर्णधारांना वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार नाही, त्यामुळे टीम इंडियामध्ये निवड व्हायचा नियम नेमका काय आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

3/8
ऋतुराज गायकवाड हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे, पण ऋतुराजने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2024 साली खेळला. यानंतर त्याची टीम इंडियात निवड झाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऋतुराजने एका सामन्यात शतकही झळकावलं.

4/8
आरसीबीला आयपीएल इतिहासताली पहिली ट्रॉफी जिंकवणारा रजत पाटीदार हा टीम इंडियाच्या सिलेक्शनच्या जवळपासही नाही. रजत पाटीदारला अजून भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधीही मिळाली नाही.

5/8
आयपीएलच्या मागच्या मोसमात लखनऊचा कर्णधार असलेल्या पंतची कामगिरी निराशाजनक झाली. ऋषभ पंत हा 2024 साली भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा भाग होता, पण आता 2026 टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये पंतला संधी मिळणं कठीण आहे.

6/8
श्रेयस अय्यरने आयपीएल 2025 मध्ये पंजाबला फायनलपर्यंत नेलं, तर 2024 साली अय्यरच्याच नेतृत्वात केकेआरने आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्याआधी श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सनाही आयपीएल फायनलला नेलं होतं. आयपीएलमध्ये स्वत:चं नेतृत्व सिद्ध करूनही अय्यरला भारताच्या टी-20 टीममध्ये स्थान मिळत नाही.

7/8
आयपीएलच्या मागच्या मोसमात अजिंक्य रहाणे हा केकेआरचा कर्णधार होता, तसंच यंदाही केकेआरने रहाणेला रिटेन केलं असून पुन्हा एकदा त्यालाच कर्णधार ठेवण्याची शक्यता आहे. असं असलं तरी अजिंक्य रहाणे 2016 नंतर भारताकडून टी-20 मॅच खेळलेला नाही.

8/8
केएल राहुल याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि लखनऊचं नेतृत्व केलं आहे, पण तोदेखील मागच्या बऱ्याच काळापासून भारताच्या टी-20 टीममधून बाहेर आहे. राहुलने भारताकडून शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच 2022 साली खेळली होती.

Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement