Car Mileage : 30 ते 40 टक्के वाढेल कारचं मायलेज, फक्त गाडी चालवताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Last Updated:
खरंतर अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टी करत असतो, ज्या कारचं इंधन अधिक खर्च करतात. पण जर तुम्ही कार चालवताना काही साध्या टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्या कारचा मायलेज नक्कीच सुधारू शकतो.
1/10
पेट्रोल-डिझेलचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक्स गाड्या पर्याय म्हणून आल्या आहेत. पण असं असलं तरी देखील त्या गाड्यांची किंमत जास्त आहेत. शिवाय आजही पेट्रोल-डिझेलच्या असंख्य गाड्या रस्त्यावर चालतात. अशात अनेकांची अशी इच्छा असते की आपल्या गाडीनं जास्त मायलेज द्यावं. पण गाडी मात्र ट्राफिकमध्ये जास्तच पेट्रोल खाते आणि जास्त इंधन खर्च होतो.

advertisement
2/10
खरंतर अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टी करत असतो, ज्या कारचं इंधन अधिक खर्च करतात. पण जर तुम्ही कार चालवताना काही साध्या टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्या कारचा मायलेज नक्कीच सुधारू शकतो.
खरंतर अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टी करत असतो, ज्या कारचं इंधन अधिक खर्च करतात. पण जर तुम्ही कार चालवताना काही साध्या टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्या कारचा मायलेज नक्कीच सुधारू शकतो.
advertisement
3/10
कारचा मायलेज वाढवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:

4/10
1. योग्य गिअरचा वापर कराकार चालवताना चुकीच्या गिअरवर गाडी चालवली गेल्यास, इंजिनवर जास्त भार पडतो आणि त्यामुळे इंधन जास्त खर्च होतं. योग्य स्पीडनुसार गिअर वापरल्यास कारचं मायलेज चांगलं राहू शकतं.

5/10
2. टायरची हवा तपासाकार सुरू करण्यापूर्वी दरवेळी टायरची हवा तपासणे आवश्यक आहे. टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजिनला जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे इंधनाचा वापरही वाढतो. त्यामुळे टायर प्रेशर नेहमी योग्य असणं महत्त्वाचं आहे.

6/10
3. स्पीडमध्ये सातत्य ठेवाकार वेगाने कधी स्लो, कधी फास्ट अशी चालवली गेल्यास इंधनाचा वापर अधिक होतो. त्यामुळे शक्य तितकं कारचा स्पीड नियंत्रित ठेवा. क्रूझ कंट्रोलसारखे पर्याय हायवेवर उपयोगी ठरू शकतात.

7/10
4. कारमध्ये अनावश्यक वजन टाळाकारमध्ये जितकं जास्त वजन असेल, तितकं इंजिनवर ताण येतो. त्यामुळे कारमध्ये गरज नसलेली सामानं न ठेवणं योग्य ठरतं.

8/10
5. AC चा वापर संतुलित कराएसी सतत चालू ठेवल्यास इंजिनवर भार वाढतो, ज्यामुळे इंधनाचा खर्च वाढतो. त्यामुळे हवामानानुसार एसीचा वापर संतुलित असावा.

9/10
कारचा मायलेज सुधारण्याचं मुख्य सूत्र म्हणजे, गाडी कशी चालवली जाते यावर अवलंबून असतं. योग्य पद्धतीने ड्रायव्हिंग, वेळोवेळी देखभाल आणि स्मार्ट सवयी अंगीकारल्यास तुम्ही तुमच्या कारचं मायलेज नक्कीच वाढवू शकता.

10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement