Instagramवर रील पाहणाऱ्यांसह क्रिएटर्ससाठी गुड न्यूज! आलंय जबरदस्त फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram Blend Feature Lunched: या प्लॅटफॉर्मवर Blend फीचर जोडण्यात आले आहे. आता त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रासोबत पर्सनलाइज रील फीड तयार करू शकता.
Instagram New Feature: इंस्टाग्राम यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता इन्स्टाग्रामने एक नवीन फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने, रील क्रिएटर्सना खूप मजा येणार आहे. खरंतर, या प्लॅटफॉर्मवर ब्लेंड फीचर जोडण्यात आले आहे. आता त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रासोबत पर्सनलाइज रील फीड तयार करू शकता.
advertisement
इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी या फीचरच्या लाँचिंगबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही ब्लेंड इंट्रोड्यूस करत आहोत. ब्लेंड हे एक अद्वितीय फीचर आहे. जे त्याच्या यूझर्सना एक नवीन अनुभव देणार आहे. डीएममध्ये मित्रांशी कनेक्ट होण्याचा हा एक नवीन मार्ग आहे. त्याच्या मदतीने, तुमच्या मित्रासोबत रीलचा एक शेअर केलेला फीड असेल.
advertisement
advertisement
हे अशा प्रकारे समजून घ्या की, या फीचरच्या मदतीने तुम्ही एक प्रायव्हेट स्पेस तयार करू शकाल. जिथे तुमच्या आणि तुमच्या मित्राच्या पसंतीच्या रील्स दिसतील. हे सतत रिफ्रेश होत राहील. जेव्हा ब्लेंडमध्ये सहभागी होणारी एखादी व्यक्ती रिअॅक्ट करेल तेव्हा इंस्टाग्राम एक सूचना पाठवेल. तुम्ही रीललाही उत्तर देऊ शकता. एकंदरीत, तुम्हाला इंस्टाग्रामवर एकमेकांशी संवाद साधण्याचा एक नवीन मार्ग मिळेल.
advertisement
एका दिवसात इंस्टाग्रामवर किती रील्स अपलोड होतात? :इंस्टाग्रामवर, दररोज तयार होणाऱ्या रील्सची संख्या बदलते. मोठे अकाउंट (50,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स) जास्त रील्स अपलोड करतात. सरासरी दररोज सुमारे 0.5 रील्स, तर लहान अकाउंट (500 पेक्षा कमी फॉलोअर्स) खूपच कमी वेळा पोस्ट करतात, सरासरी दररोज सुमारे 0.18 रील्स.